
भिलकटी ग्रामपंचायत जोमात जल जीवन मिशन कोमात?
भिलकटी गावात जलजीवन मिशनाच्या कामाची दर्जेदारी प्रश्नांकित ?
फलटण:फलटण तालुक्यातील भिलकटी गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या बंदिस्त पाणीपुरवठा पाईप लाईनच्या कामावरून स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते नाराज आहेत. या कामाची दर्जेदारी अत्यंत निकृष्ट असल्याची टीका होत आहे. पाईप लाईनची खोली एक फूट असल्याने भविष्यात मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे पाईप लाईन तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी पाईप लाईन मध्ये अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याच्या चर्चा तर ही पाईप लाईन खोली खूपच कमी घेत आहेत.
त्या मुळे भविष्यात या ठिकाणाहून मालवाहतूक वाहन गेल्यास पाईप लाईन खोली कमी असल्याने तुटण्याची शक्यता दाखवली जात आहे.हे काम संबधित ठेकेदार हा कोणाच्या तरी जवळीक राहून निकृष्ट पद्धतीने अधिकारी हाताशी धरून काम निकृष्ट करत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या.त्यामुळे हे काम त्वरित थांबवण्यात यावे व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी गावातील ग्रामस्थ प्रशासन अधिकारी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग उपविभागीय फलटण यांच्याकडे करीत आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या कामातील निकृष्टता ठेकेदाराच्या आणि अधिकाऱ्यांच्या एकमेकाच्या सहकार्यामुळे आहे, असे म्हटले जात आहे. या प्रकरणी तत्काळ लक्ष दिले नसल्यास सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करण्याचा इशारा देत आहेत.