
फलटण: फलटण शाखा आणि समविचारी समता संघटना मिळून जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात समता घरेलू महिला कामगार आणि सामाजिक बांधिलकी असणार्या महिलांना अंनिस फलटण शाखे तर्फे अंनिस समाज प्रबोधिनी पुरस्काराणे ॲड. कांचनकन्होजाताई धोंडीराम खरात, कल्पनाताई मोहिते, नकुसा फरतडे,साजिया यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी कल्पना मोहिते यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन केले,अंनिस फलटण शाखेचे कार्यकर्ते वसिम शेख सर,अयाज आतार सर,आरती काकडे आणि मोहिनी भोंगळे यांनी कार्यक्रमाची पुर्ण जबाबदारी घेतली.अध्यक्षस्थान मा. आनंद देशमुख सर यांनी भूषविले, प्रमुख उपस्थिती दादासाहेब चोरमले व सुपर्णाताई अहिवळे तसेच मंदाकिनी गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन व महिलांच्या अंधश्रद्धा यांवर भाष्य केले.
त्याचबरोबर अंनिसचे कार्यकर्ते गिरीश बनकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिलांना मार्गदर्शन केले.अंनिसचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव सर यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा महिलांना वाटल्या,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन झाले, ॲड. कांचनकन्होजाताई यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. अशा पद्धतीने महिलादिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.