दौंड नगरपालिकेतील मोठा घोटाळा उघड

दौंड प्रतिनिधी :सदाशिव रणदिवे

दौंड:कर निर्धार व प्रशासकीय सेवा ( श्रेणी-ब )नगरपरीषद दौंड हे २५\११\२०२३ते आज पर्यंत दौंड नगरपरिषद मध्ये काम करत नाही पण पगार घेत आहेत. नेमकं हे निवडूनक संपल्या नतंर सुद्धा पुर्व पदावर काम न करता फूकटचा पगार दौंड नगरपरिषदचे मार्फत लाटत आहे नेमके कारण काय?दौंड नगरपरिषदचे श्री सुशांत नरहरे, कर निर्धार व प्रशासकीय सेवा ( श्रेणी-ब )नगरपरीषद दौंड हे निवडूनक कामकाजा संदर्भात दि.२५\११\२०२३ रोजी कंटोमेंट बोर्ड पुणे येथे गेले होते. मात्र निवडूनक कार्यकाळ संपल्या नतंर ते पुर्व पदावर कायदेशीर रूजू होणे गरजेचे आहे. तरी ते अदयाप रूजू न होता दौंड नगरपरिषदे कडून पगार घेत आहेत. करवसूल करणारा अधिकारी नसताना दौंड नगरपरिषद सर्व सामान्य जनतेने कडून कर कसा वसूल करत आहे? आणि गोरगरीब जनते कडून कर वसूल करून हया फूकट कर वसूल अधिकारी यांना कसा पगार देत आहे. असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडलेला आहे. असे कती अधिकारी व कर्मचारी आहे जे काम न करता दौंड नगरपरिषदे कडून पगार घेत आहेत. हयाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पॅथर जयदीप बगाडे दौंड अध्यक्ष न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य व सर्व सामान्य जनतेने कडून केली जात आहे. हयाना नेमके पाठीशी कोण घालत आहेत. जर हे अधिकारी दौंड नगरपरिषद मध्ये काम करत नाही तर दौंड नगरपरिषद यांनी यांना पगार का दयायचा हे मात्र कळत नाही? आज दौंड नगरपरिषदचे कर निर्धारण व प्रशासकीय सेवा देणारे अधिकारी कोण आहे हया संदर्भात अस्थापना अधिकारी व मुख्याधिकारी उत्तर देत नाही. करवसूल करणारा अधिकारीच फूकट पगार घेत आहेत तर जनतेने कर का भरायचा हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.दौंड चे मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी नगरपालिका प्रशासन विभाग व निवडूनक अधिकारी पुणे कंटोमेंट बोर्ड हे देतील का? आणि दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय कावळे यांनी यावर काय कारवाई केली हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच दौंड चे लोक प्रतिनिधी मा.आमदार राहूल दादा कूल हे हया संदर्भात काय निर्णय व कारवाई करणार हया कडे संपूर्ण दौंड च्या जनतेचे लक्ष लागले आहे. फुकट पगार लाटणारे अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी पॅथर जयदीप बगाडे दौंड अध्यक्ष न्यू महाराष्ट्र पॅथर सेना महाराष्ट्र राज्य हे करत आहे. अश्या फुकटया अधिकारी व कर्मचारी यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली आहे. जर हयाना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत आसतील तर त्याना सुद्धा दोषी ठरवून कारवाई करण्यात यावी ही सर्व सामान्य जनतेची मागणी आहे. हया मध्ये आमदार राहूल कूल यांनी जातीने लक्ष घालून सखोल चौकशी करण्याची मागणी पॅथर जयदीप बगाडे दौंड अध्यक्ष न्यू महाराष्ट्र राज्य हे करत आहे. तसे झाले नाही तर दौंड च्या जनतेने दौंड नगरपालिकेला कर स्वरूपातील रक्कम वसूल करण्यास येणारे अधिकारी व कर्मचारी यांना जाब विचारला पाहिजे.

दौंड नगरपालिकेत अंधळ दळतंय आणि कुत्र पीठ घातय अशीच अवस्था झाली आहे. आणि आमदार साहेब तसेच दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय कावळे व जिल्हाअधिकारी मूग गिळून गप्प का आहेत? हयाची चौकशी करण्यात यावी. एक दौंड चा सर्व सामान्य नागरिक जो दौंड च्या हिता साठी लढत आहे. ही पोस्ट नगर विकास मंत्री व पुणे जिल्हा धिकारी, आमदार राहूल कूल यांना पोच झाली पाहिजे असे मत सर्वसामान्य नागरिकांकडून कडून येत आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!