
सातारा – डायग्नोस्टिक सेंटर सातारा येथे जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉक्टर जयश्री शिंदे डायरेक्टर, डायलीसिस तज्ञ,सातारा हॉस्पिटल सातारा तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माधवबाग क्लिनिक हेड डॉक्टर देवकी पळणीटकर माधवबाग सातारा, प्राध्यापिका शालिनी जगताप, डॉक्टर चंद्रकांत नलावडे, श्री. श्रीकांत देशमुख मॅनेजर पब्लिक रिलेशन सातारा हॉस्पिटल सातारा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद महिलांचा मिळाला.
एकूण 105 महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यात आला त्यामध्ये ,शुगर बी एस एल, बीपी रक्तदाब व जनरल चेकअप, गरजेनुसार ई सी जी तपासणी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संदीप कांबळे केंद्रप्रमुख कामगार कल्याण केंद्र सातारा यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत देशमुख मॅनेजर पब्लिक रिलेशन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरता श्री. सोमनाथ चोरगे, सौ.सुजाता जाधव, सौ. तृप्ती निकम, सौ. ज्योती मोरे यांनी परिश्रम घेतले.