
दौड प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
दौंड:ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड किरण लोंढे यांची नियुक्ती ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था गेली 13 वर्ष सामाजिक कला, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा या क्षेत्रात सतत कार्यरत आहे.

या संस्थेची नोंदणी 09 ऑगस्ट 2013 रोजी करण्यात आली या संस्थेचे मूळ उद्देश्य गोरगरीब, पीडित,शोषित या लोकांना मदत करणे तसेच यांना न्याय देण्याचे काम या संस्थेच्या वतीने करण्यात येते या साठी दौंड तालुक्यातील प्रसिद्ध वकील केंद्रीय विधी व न्याय विभाग भारत सरकार नोटरी चे ॲड मा.किरण लोंढे यांची संस्थेच्या महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आले आहे यांचे मूळ गाव मलटण दौंड तालुक्यातील आहे त्यांनी शिक्षण घेण्यासाठी खूप परिश्रम घेतले त्यांचा सल्ला घेण्यासाठी दौंड तालुक्यातील अनेक भागातून लोक येत असतात म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी ॲड सागर शेळके, ॲड सुजित चिंचोरे ॲड रूपचंद अंबोदरे तसेच सामाजिक कार्यकर्ते विनायक गंगावणे यावेळी उपस्थित होते या निवडीने दौंड शहरात व तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात आले आहे.