श्रेयश खिलारे याचे मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये यश

सोलापूर/प्रतिनिधी भैय्या खिलारे:

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वेस्ट झोन निवड चाचणी मध्ये पंढरपूर तालुक्यातील लोणारवाडी येथील श्रेयश विजय खिलारे यांनी वयाच्या बाराव्या वर्षी १४ वर्ष वयोगटात पहिल्या प्रयत्नात यश संपादन केले आहे.मे २०२४ पासून जानेवारी २०२५ पर्यंत झालेल्या चाचणी सामन्यातून हि निवड करण्यात आली. निवड झालेल्या मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, बडोदा व सौराष्ट्र या संघात सामने होणार आहेत.श्रेयश वयाच्या पाचव्या वर्षापासून संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी, कल्याण ठाणे येथे संतोष पाठक यांचेकडे प्रैक्टिस केली.

त्यानंतर त्यांनी संजीवनी क्रिकेट अकादमी बांद्रा मुंबई येथे जानेवारी २०२१ पासून सतीश सामंत यांचे कडील प्रैक्टिस बरोबरच स्कूल क्रिकेट ही सुरू होते. त्याने शालेय अंडर १४ गायल्स शील्ड व अंडर १६ हॅरिस शील्ड व सिलेक्शन मैचमध्ये शतके करून उत्कृष्ठ कामगिरी केली, त्यामुळे त्याचे सिलेक्शन झाले आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये सोलापूर जिल्ह्यातून एकमेव श्रेयश खिलारे याची निवड झालेबद्दल त्याच्यावरती राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील क्रीडाप्रेमी यांच्यावतीने शुभेच्छांचा वर्ष होत आहे. श्रेयश ने आपल्या गावाबरोबर आई वडील व गुरुजनांचे नाव रोशन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!