महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे एक लाख वीस हजार चे नुकसान

सोलापूर/ प्रतिनिधी भैय्या खिलारे

सांगोला: सांगोला तालक्यातील लक्ष्मीनगर येतील दत्तात्रय मारुती नरळे यांनी शेतातील पीक काढणी साठी आलेली मका आणि मक्याची कणसे हे मोडणी करून त्याने आपल्या खळ्यावरती सर्व साहित्य ठेवलेले होते साधारण जवळजवळ एक लाख वीस हजार च्या पुढे येणारे पीक महावितरणाच्या ठिणगी पडून आग लागून संपूर्ण पिक जळून खाक झालेले आहे. यामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झालेले आहे यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे .

यामध्ये त्याचे वर्षभराचे पीक जळल्यामुळे शेतकऱ्याच्या घरावर एक प्रकारे उपासमारीची वेळ आली आहे. या लागलेल्या आगीमध्ये बरेच मोठे नुकसान झाल्याने गावातील तसेच शेजारीपाजारी लोक मोठ्या प्रमाणात हळहळहळ व्यक्त करत आहेत यामुळे याकडे महावितरणाने त्यांचे झालेले नुकसान भरपाई म्हणून द्यावी हे शेतकऱ्याची तसेच गावकऱ्यांची मागणी आहे .याकडे महावितरण किती गांभीर्याने पाहणार आहे याची चिंता शेतकऱ्याला व गावकऱ्यांना लागलेले आहे .झालेले नुकसान भरपाई करून देण्यात यावी ही मागणी गावकऱ्यांच्या असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी महावितरणाने आपल्या हलगर्जीपणामुळे झालेली नुकसान लवकरात लवकर त्या शेतकऱ्याला द्यावी ही त्या शेतकऱ्याची व गावकऱ्यांची मागणी आहे. ढिगाला महावितरणच्या हालगर्जीमुळेपणामुळे लागली आग .

आगीमध्ये शेतकऱ्याचे एक लाख वीस हजार रुपयेच शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!