
प्रतिनिधी तानाजी सोडमिसे
बारामती:इस्कॉनच्या बारामतीच्या वतीने डोरलेवाडी न्यू इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी श्रीमद्भगवद्गीता दान स्वरूपात वितरित केल्या गेल्या. माननीय मुख्यध्यापक माने सर तसेच त्यांचा स्टाफ, गावचे सरपंच माननीय मनोज नाळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १३१भागवत गीता इस्कॉन बारामती च्या वतीने दान केल्या.

इस्कॉनच्या वतीने संजीवनी गिरमकर यांनी मुलांना भगवद्गीतेवर अतिशय उद्बोधक असे मार्गदर्शन केले.अर्जुनाच्या जीवन चरित्रातून विद्यार्थ्यांसाठी असणारे काय काय संदेश घेऊ शकतो याची इतिहासातील उदाहरण दिले. आपली ध्येय प्राप्त करण्यासाठी योग्य सवयी, त्यामध्ये असणारे सातत्य, जीवनामध्ये योग्य असे ध्येय ठेवणे, त्या दृष्टीने प्रामाणिकपणे समर्पित राहणे, विद्यार्थी जीवन म्हणजे पुढील जीवनाचा पाया होय. अभ्यासावर ध्यान केंद्रित करताना अतिशय विचलित करणाऱ्या गोष्टीही आहेत. त्यामध्ये सर्वात विचलित करणारा व मुलांचा वेळ घालवणारा मोबाईल, मीडिया यापासून कसे दूर राहिले पाहिजे. आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक,योग्य गुरू यांची गरज असते.

या विद्यार्थी जीवनामध्ये मध्ये योग्य संगतीची गरज असते असे विविध दृष्टिकोन त्यांनी त्यांच्या व्याख्यानांमधून मधून दिले. याप्रसंगी इस्कॉनच्या वतीने वैशाली खोत, जयश्री गावडे, जयश्री खोत तसेच डॉक्टर दिपाली शिंदे या उपस्थित होत्या. सर्व ग्रामस्थ तसेच माननीय मुख्याध्यापक माने सर तसेच सर्व अध्यापक वर्ग यांनी विशेष आभार मानले.