
फलटण बारामती रोडवर एसटीला भीषण आग सुदैवाने जीवितहानी नाही चालक व वाहक, फलटणचे सामाजिक कार्यकर्ते मोहन पोतेकर व त्यांच्या मित्रांनी जीवाची पर्वा न करता वाचवले प्रवाशांचे प्राण
फलटण प्रतिनिधी:फलटण-बारामती हम रस्त्यावर अलगुडेवाडी (गणेश नगर) दरम्यान बारामती-कोल्हापूर सीएनजी एसटीला तीन वाजण्याच्या सुमारास चालत्या एस टी मध्ये भीषण आग लागली असून सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. चालक आणि वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे २० ते २५ प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे.सदर बस ही बारामती वरून कोल्हापूरला जात असताना फलटण नाजिक एसटी बसच्या इंजिन मधून धूर येत असल्या चालकाच्या निर्देशनास आल्यानंतर चालका,वाहक व फलटणचे सामाजिक कार्यकर्ते मोहन पोतेकर व त्यांच्या मित्रांनी बसमधील मधील वीस ते पंचवीस प्रवाशांना बाहेर काढून त्यांच्या जीविताचे रक्षण केले असून मोठी दुर्घटना टळली आहे.एसटी पूर्णतः जळून खाक झाली आहे.
दरम्यान श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या व फलटण नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली तसेच फलटण शहर पोलीस स्टेशन व आरोग्य विभाग तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली.