
फलटण:समर्थक पै.गणेश गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक खटके आण्णा, ढवळ गावचे सरपंच अंकुश लोखंडे, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत केली. विधानसभा परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नूतन उपसरपंच गणेश गोरे यांचे अभिनंदन करुन मा.सभापती रामभाऊ ढेकळे,होलार समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक गोरे, मार्गदर्शक रघुनाथ ढोबळे, तालुकाध्यक्ष ईश्वर जाधव , भगवान आवटे ,प्रकाश जाधव, मल्हारी करे यांच्या उपस्थितीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तद्नंतर निरगुडी गावातील होलार समाज बांधवांच्या वतीने गणेश गोरे यांचे उपसरपंचपदी निवडीबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. समारंभाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक महेंद्र गोरे यांनी केले. आभार अनिल गोरे यांनी मानले.
सत्कार समारंभासाठी होलार समाजाचे युवक नेतृत्व राहुल करे,दशरथ जाधव , बाळासाहेब करे, अविनाश जाधव, राघुजी करे आदी मान्यवर तसेच भैरवनाथ तरुण मंडळाचे ज्येष्ठ महादेव गोरे, तानाजी गोरे, युवक नेतृत्व निलकुमार गोरे, सुनिल गोरे, संतोष गोरे ( गुरुजी), मंडळाचे अध्यक्ष अजित गोरे, खजिनदार अजित गोरे, लहु गोरे, अक्षय आवटे, संदीप गोरे, अमित आवटे, रणजित गोरे, प्रविण गोरे, हनुमंत गोरे,किसन गोरे,विघ्नेश गोरे,शंतनू गोरे, आदी महात्मा फुले नगर मधील कार्यकर्ते उपस्थित होते.