प्रजा गटाच्या प्रयत्नांतून दुधेबावी (ता. फलटण) गावातील डीपी पुन्हा सुरू : प्रदिप झणझणे

जनसेवक प्रदिप झणझणे यांच्या कार्याचा दुधेबावी गावाच्यावतीने जाहीर सत्कार

फलटण:फलटण तालुक्यातील दुधेबावी गावातील निळकंठ मळा डीपी नादुरुस्त झाला होता. याबाबतची तक्रार शेतकऱ्यांनी प्रजा गट फलटण तालुका जनसंपर्क कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रदीप झणझणे यांच्याकडे केली होती.

सदर तक्रारीनंतर प्रदीप झणझणे यांनी फलटण वीज महावितरणचे मुख्य अभियंता ग्रामोपाध्याय यांचेशी संपर्क साधला व त्यांना शेतपीकांच्या व जनावरांच्या पाण्याच्या समस्येबाबत सविस्तर माहिती देऊन तात्काळ डिपी बसवण्याची सुचना केली होती.त्याप्रमाणे प्रजा गटाच्या माध्यमातून प्रदीप झणझणे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेत वीज महावितरणकडुन दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी सदर डिपी तात्काळ बसवण्यात आला. दुधेबावी गावातील शेतकऱ्यांच्यावतीने फलटण तालुक्याची निस्वार्थ सेवा करत असलेबाबत प्रजा गटाचे प्रदीप झणझणे यांचा हार, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व शेतकऱ्यांनी प्रजा गटाचे व विज महावितरणचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

यावेळी दुधेबावी गावाने केलेल्या आदर सत्काराबद्दल शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा कायम ऋणी असल्याची कृतज्ञतापूर्वक भावना प्रजा गटाच्यावतीने प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!