
फलटण : श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याचा ऊसाचा एफआरपी नुसार दर हा २६५० रुपये प्रति टन इतका येत आहे. मात्र जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी दिलेला दर व फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेली मागणी याचा सकारात्मक विचार करून आमचा कारखाना गळीत हंगाम २०२४/२५ मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला पहिली उचल म्हणून रुपये ३१०० रुपये प्रति टना प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती श्री दत्त इंडिया कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली मागील चार हंगामामध्ये श्री दत्त इंडिया साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला दर देण्यामध्ये कधीही कमी पडला नसून भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांना अधिक दर देण्याचा आमच्या कारखान्याचा प्रयत्न राहणार असून फलटण तालुक्यासह तालुक्या बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा संपूर्ण ऊस श्री दत्त इंडिया साखर कारखान्याला गाळपास देण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी व्हॉइस प्रेसिडेंट भारत तावरे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी रमेश बागनवर, दिगंबर माने, टेक्निकल युनिट हेड अमोद पाल, अकाउंट जनरल मॅनेजर अमोल शिंदे, चीप इंजिनिअर अजित कदम, फलटण तालुका साखर कामगार सेक्रेटरी राजेंद्र भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले पै संतोष भोसले गोरख, भोसले सुहास गायकवाड, पोपट भोसले,संजय जाधव उपस्थित होते.
