
राजे गटाला दे धक्का, ग्रामपंचायत सदस्याचा भाजप मध्ये जाहीर प्रवेश
फलटण: माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत कोळकी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य गणेश दिनकर शिंदे यांनी राजे गटाला रामराम ठोकत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला.
यापुढे तालुक्याचा व गावाच्या विकासासाठी आम्ही माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे तालुक्याच्या विकासासाठी खंबीर नेतृत्व आहे.त्यामुळे भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.असे मतं व्यक्त केले.
त्यावेळी जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे , फलटण तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रणजीत जाधव ,ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह उर्फ बबलू निंबाळकर ,यशवंत जाधव ,राजन खिल्लारे , गोरख जाधव , डॉक्टर प्रमोद अब्दागिरे ,निरंजन निंबाळकर ,अँड.सुरेश शिरसागर, योगेश शेलार ,अंकुश शेलार यावेळी उपस्थित होते.
