विश्वरत्न बोधीसत्व घटनाकार परम पूज्य भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त

विश्वरत्न बोधीसत्व घटनाकार परम पूज्य भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

मुंबई दादर:महाराष्ट्रातील देशाच्या कानाकोपऱ्यांतुन येणाऱ्या भिम अनुयायांना आराम करता यावा म्हणून शिवाजी पार्क मध्ये सर्व महापुरूषांच्या प्रतिमा तसेच हत्ती निशाण, निळे, झेंडे, बॅनर , लाईटस अशी व्यवस्था बहुजन समाज पार्टी चा पॅन्डोल बसपा प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी नेतृत्व अँड.सुनिल डोंगरे साहेब , बसपा राज्य कार्यकारणी सदस्य मा.किरणजी अल्हाट साहेब यांनी तमाम बसपा हितचिंतक कार्यकर्ते यांची बैठक व्यवस्था व चहा ,पाणी, नाष्टासह सोय करण्यात आली आहे .

तसेच या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील बसपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यासह सातारा जिल्हातील एकनिष्ठ स्वाभिमानी युवा नेतृत्व प्रदिप उर्फ प्रेम सुरेश मोरे,माण -खटाव विधानसभेतील जेष्ठ नेते मा.संदेशजी वाघमारे साहेब ,महेद्र खैरमोडे,अनिल झेंडे , फलटण विधानसभा युवा नेतृत्व मा.सुहास काकडे आदी

फलटण माण खटाव सातारा वरुन आलेले कार्यकर्ते समवेत धम्मकार संजय घोरपडे, नेताजी भोसले, दादाजी भोसले, जगताप,फलटण ओबीसी नेते प्रकाश गिरी, दिनेश कांबळे,प्रविण विटकर,जेष्ठ नेते उदय काकडे , सातारा जिल्हा माजी जिल्हा अध्यक्ष मंगेश मोरे उपस्थित होते.तसेच मुंबई ची बसपा टिमला चव्हाण साहेब ,किर्तावडे साहेब,बाळू भोसले यांना पॅन्डोल मध्ये भेट देवून घटनाकार विश्वरत्न बोधीसत्व भारतरत्न प.पु.डॅा.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला तसेच चैत्यभुमी ठिकाणी अभिवादन केले .

बसपा मजबुती ने लढाऊ कार्यकर्ते ची फळी निर्माण करणारी तसेच महापुरूषांना अभिप्रेत देशातील एकमेव राजकीय राष्ट्रीय दर्जा निर्माण करणारा पक्ष बसपा असुन सर्व महापुरूषांचे विचारसरणी वरती अभिप्रेत कार्यकर्ते बनवणारी पक्ष संघटना आहे .प्रदेश अध्यक्ष सुनिल डोंगरे साहेब यांचे कार्य सर्व लहान थोरामोठयांना मान पान सन्मान विचारपूस देखरेख करणारे नेतृत्व यांच्या नेञुत्वात नक्कीच महाराष्ट्रात नवा इतिहास घडणार असे मुंबईच्या भेट घेतल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता ऊर्जा मय बनला असे भेटून प्रत्येक कार्यकर्ते ना वाटले आणि सर्वानी आपले मनोगत व्यक्त केले .सर्व बसपा पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते चे आभार मानले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!