पोलिसाचा हातभट्टीच्या दारूवर दणका,१० हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

फलटण:१० हजार ५०० रूपयाची हातभट्टीची दारू पकडली,दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून खामगाव तालुका फलटण येथे पाडेगाव जाणाऱ्या रोड लगत २१० लिटर दारू १० हजार ५०० रूपये किंमतीची जप्त केली आहे. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मनीषा प्रशांत कर्मावत व प्रशांत कर्मावत या दोघावरती दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार हजारी करत आहेत. फलटण तालुक्यातील आणि गावात दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पोलिसांचा डोळा चुकून दारू विक्री करण्याचा प्रकार घडत आहे पोलीस प्रशासन याच्यावर बंदी घालणार का ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!