विकास कामाच्या मार्केटिंग मध्ये राजे गट कमी – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

फलटण:फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीत सत्ता अबाधित ठेवण्यात अपयशी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर आज अनंत मंगल कार्यालयात राजे गटाचा कार्यकर्त्याचे संवाद मेळावा पार पडला. विकास कामाच्या मार्केटिंग मध्ये आपण कमी पडलो असल्याची खंतही या मेळाव्यात प्रमुख वक्त्यांनी बोलून दाखवली असल्याचे समजत आहे.

तसेच मेळाव्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी आपण मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली; पण ती लोकांमध्ये पोहचवण्यात कमी पडलो असे कबूल केले.असल्याची चर्चा पहायला मिळाली. सातारा जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपण केलेली विकास कामे मतदारापर्यंत पोचवण्यात कमी पडलो. असे सांगत सरकारची लाडकी बहीण योजना शेतकरी, वीज बिल माफी यांचा सुद्धा फटका बसला असल्याचे स्पष्ट केले. तर माजी आमदार दीपक चव्हाण यांनी आपण केलेली विकास कामे लोकांच्या निदर्शनास आणून देण्यास कमी पडलो. हे सांगताना विकास कामाचा डोंगर उभा केला. पण त्याचे मार्केटिंग करण्यास अयशस्वी ठरलो आहे. असे माजी आमदार दिपकराव चव्हाण म्हणाले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!