
फलटण:उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या एकत्रित ताकदीपुढे राजे गटाला शरणागती पत्करावी लागली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बाले किल्लाला सुरूंग लावण्यात दोन्ही दादा यशस्वी झाले .सलग तीन वेळा आमदार म्हणून असलेले दीपक चव्हाण या शिक्षकावर सचिन पाटील हा शेतकरी भारी पडला. सचिन पाटलांना 1 लाख 19 हजार 287 मते तर दीपक चव्हाण यांना 1लाख 2 हजार 241 मते मिळाली. सचिन पाटील यांना 17 हजार 46 मतांनी विजयी झाले आहेत.
