
फलटण:फलटण कोरेगाव विधानसभा – फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 2019 च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 2024 मध्ये पार पडलेल्या आजच्या मतदानात वाढ झाल्याची पाहिला मिळत आहे.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या मतदारांची संख्या एकूण 3 लाख 39 हजार 662 इतकी आहे.त्यामध्ये आज पार पडलेल्या मतदानात दुपारी 1:00 वाजेपर्यंत 33.81% मतदान झाले. दुपारी 3:00 वाजेपर्यंत 48.41% मतदान झाले. संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत 63.01% मतदान झाले. तर एकूण मतदानापैकी 2,41,329 एवढे मतदान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार 71.05% मतदान झाले आहे. 17 सी फॉर्म तपासणीनंतर आज रात्री उशिरा मतदान समजणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब यांनी दिली आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण कोरेगाव विधानसभा स्विप नोडल अधिकारी सचिन जाधव व त्यांच्या संपूर्ण टीमने गेली महिनाभरापासून संपूर्ण मतदारसंघात राबवलेल्या विविध मतदान जनजागृती अभियानामुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढण्यात मदत झाली आहे. 2019 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 65.53% मतदान झाले होते तर यावेळी 71.05% मतदान
झाले आहे.
