फलटण प्रतिनिधी: देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांची महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक १६/११/२०२४ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता गजानन चौक फलटण येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. तरी या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असून स्वतः दीपक चव्हाण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,सह्याद्री भैया कदम,महेंद्र भैय्या बेडके व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण:कोरेगाव विधानसभा मतदारसंघात वाडीवस्तीवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत पिंजून काढत आहेत.तसेच फलटण शहरांमध्ये प्रत्येक प्रभागात जाऊन श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे
