विधानसभेत आपल्याला तुतारी फुंकायचीय : श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर

पुरोगामी महाराष्ट्र रसातळाला घेऊन जाण्याची कृती थांबवण्याचे काम शरद पवार करत आहेत. महाराष्ट्राचं भविष्य सुरळीत व्हावं या उद्देशाने कुठलाही स्वतःचा फायदा नसताना याही वयात शरद पवार ठामपणे उभे आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका मतदारांनी घ्यावी. लोकसभेपेक्षा दुप्पट ताकदीने विधानसभेला आपल्याला तुतारी फुंकायचीय; त्याचा आवाज दिल्लीला गेला पाहिजे .असे आव्हान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ साखरवाडी तालुका फलटण येथे आयोजित सभेत श्रीमंत संजीव राजे बोलत होते व्यासपीठावर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील फलटण पंचायत समितीची माजी सभापती विश्वजीत राजे नाईक निंबाळकर महेंद्र सूर्यवंशी बेडके, सह्याद्री कदम नितीन भोसले, भगवानराव होळकर शंकराव माडकर ,राजाभाऊ भोसले सतीश माने, सौ रेश्मा ताई भोसले शंभूराज खलाटे ,सुधीर भोसले विकास नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, “ज्याच्या सोबत आपण आजवर एकत्र काम करत आलोय; त्याच्याशीच आपण आज भांडतो आहे. भाजपचा हा कावा जनतेने लक्षात घेतला पाहिजे हे सर्व घडवून कोणी आणलं? महाराष्ट्राच्या राजकारणाचा बटटयाबोळ करणारा धनी कोण आहे ?याचा शोध घेऊन त्याचा सहमूळ नायनाट आपल्याला येत्या 20 नोव्हेंबर करायचा आहे.

आपले उमेदवार दीपक राव चव्हाण हे पंधरा वर्षांपूर्वी जसे होते. तसेच आजही आहेत. सुसंस्कृत, सुशिक्षित नेत्याच्या आणि ज्यांनी निवडून दिले त्यांच्या ठायी त्यांची निष्ठा आहे. लोकांच्या सुख: दुःखात समरस होणारा आपला उमेदवार आहे .मतदार संघाला कमीपणा येईल अशी त्याची एकही कृती आपल्याला दाखवून द्यावी. शिवाय विधानसभेमध्ये एक कर्तव्यदक्ष आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. सर्वाधिक प्रश्न विचारणारा आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळे हातात अमृताचा प्याला असताना विषयाची परीक्षा घ्यायला जावू नका. आपले उमेदवार दीपक चव्हाण यांना चांगल्या मताधिक्याने निवडून द्या. असे आवाहन श्रीमंत संजीव राजे यांनी मतदारांना केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!