राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याकडे फलटणकरांचे लक्ष; फलटणसाठी अजितदादा काय घोषणा करणार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा बुधवार दि. 6 रोजी प्रकाशित होणार आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांनी अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्याकडे गेल्यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही भारतीय जनता पार्टीकडे जाणे अपेक्षित होते.

परंतु उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांनी फलटणची जागा स्वतःकडे ठेवत फलटण साठी विशेष प्लॅन केला असल्याची माहिती समोर आली आहे

त्यामुळे आज प्रकाशित होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये फलटणसाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार काय घोषणा करणार याकडे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.

भारतीय जनता पार्टीचे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सचिन कांबळे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत. महायुतीच्या माध्यमातून सचिन कांबळे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिकीट मिळाले आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा विजय व्हावा! यासाठी फिल्डिंग लावलेली आहे. लोकसभा निवडणूक झाल्यापासून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटण तालुका पिंजून काढत आहेत.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये लढत अटीतटीची होत असल्यामुळे काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!