फलटण शहराच्या विकासासाठी दीपक चव्हाण यांच्याकडून कायमच भरघोस निधी : पांडुरंग गुंजवटे

आगामी काळामध्ये सुद्धा फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी फलटण शहरासह तालुक्यातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपक चव्हाण यांच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा पुढे बटन दाबून आमदार दिपक चव्हाण यांना पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजयी करावे; असे आवाहन फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनी केले.

विधानसभेची निवडणूक लागली असून फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दिपक चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. राजे गटाच्या माध्यमातून फलटण शहराचा कायापालट करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून भरघोस असा निधी दिपक चव्हाण यांनी गत १५ वर्षांच्या कालावधीमध्ये मंजूर करून घेतलेला आहे.

फलटण शहरामध्ये विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी पुन्हा एकदा दीपक चव्हाण यांना विधानसभेवर निवडून पाठवणे गरजेचे असल्याचे मत सुद्धा पांडुरंग गुंजवटे यांनी यावेळी व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नये !!